)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A0134B0E025B742F12E41658C476B691BABE22D4F29DB3791A.file) क्रिया : १) दंडासनात बसून डावा पाया दुमडून टाचेला सिवनीवर (गुदा वा उपस्थेंद्रीयाच्या मध्य भागावर) लावा. २) उजव्या पायाच्याटाचेला उपस्थेंद्रीयाच्या वरील भागावर स्थिर करा. ३) डाव्या पायाच्या घोट्यावर उजव्या पायाचा घोटा पाहिजे. तळपाय, जांघा वा पोट-यांच्या मध्ये असावे.४) गुडघे जमिनीला टेकलेले असावेत. दोन्ही हात ज्ञान मुद्रेच्या स्थितीत गुडघ्यावर टेकून ठेवा. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A034D89FFDABC2323B20246B0DE9A277BF1A2D7F841716B8F2.file) क्रिया :१. जमिनीवर पालथे झोपा. हात दुमडून तळवे एकमेकांवर ठेवा.२. माथा दोन्ही हातावर टेकवून ठेवा. पायात एक फूटाचे अंतर असावे.३. शरीराला प्रेतासारखे शिथिल सोडा. या आसनात झोपून तुम्ही प्रेताचे ध्यान करा आणि विवेकपूर्वक चिंतन, मनन करत स्वत:ला आत्मकेंद्रित करा. मी या शरीरापासून पृथक, शुद्ध-बुद्ध, आनंदमय व अविकारी चैतन्य आत्मा आहे. हे शरीर तर नश्वर आहे. हे शरीर केवळ पंचतत्वांचा समूह आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा हे शरीर पंचतत्वात विलीन होऊन जाईल. हे शरीर व इतर संपत्ती इथेच राहून जाईल. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A0F06AC4B8E5B3908F22E958EBA9AA700C8A6D1EEA228F290D.file) क्रिया - १. एखाद्या लांब वस्त्राची गोलाकार गादी बनवा. दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंतवा व कोपर्यापर्यंत हात जमिनीवर टेकवा. गुंडाळी हातांच्या मध्ये ठेवा.२. डोक्याचा वरचा भाग गादीवर व गुडघे जमिनीवर टेकलेले असावेत. आता शरीराचा भार मानेवर व कोपरांवर संतुलित करत पायांना जमिनीच्या समानांतर सरळ करा.३. आता एक गुडघा दुमडत वर उचला व त्यानंतर ताबडतोब दुसरा गुडघाही वर उचलून दुमडून ठेवा.४. आता दोन्ही गुडघ्यांना एक एक करून वर उचलण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला घाई करू नका. हळू हळू पाय सरळ करा. जेव्हा पाय सरळ होतील तेव्ह Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A0B02BAE396C11CEAA7F631BC2349C94627085CFAC9268DA7D.file) क्रिया - १) जमिनीवर सरळ झोपा. श्वास आत घेऊन हळू हळू पाय उचला. आधी ३० डिग्री, मग ६० डिग्री, मग ९० डिग्री उचलल्यानंतर श्वास बाहेर सोडत पाठ उचलत पायांना डोक्याच्या मागे न्या. सुरुवातीला हातांना आधारासाठी कंबरेच्या मागे लावा. २) हळू हळू पायांना डोक्याच्यामागे टेकवून दोन्ही गुडघे वाकवून कानांना लावा. श्वासाची गती सामान्य ठेवा. पूर्ण स्थितीत आल्यावर हात जमिनीवर सरळ ठेवा. अशा स्थितीत ३० सेकंद रहा. ३) परत पूर्वस्थितीत येताना जमिनीवर हातांनी दाब देत गुडघे सरळ ठेवत पाय उचलून परत जमिनीवर टेकवा. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A05F1EA9871C5A07D7CD36C382927ECB484DD069D0B4C8E2ED.file) क्रिया - १) पद्मासनात बसून उजव्या हाताचा तळहात आधी नाभीवर ठेवा. २) आणि डावा तळहात उजव्या हातावर ठेवा. ३) मग श्वास बाहेर सोडून पुढे वाका. ४) हनुवटी जमिनीवर टेकवा व नजर समोर ठेवा.५) श्वास आत घेऊन पूर्वस्थितीत या. असे ४-५ वेळा करा. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A05F55A40C5F5A1F407D6D71381965CAAEE2B1AE53B6B4E79F.file) क्रिया - १. वज्रासनात बसून श्वास आत घेऊन दोन्ही हात वर उचला. २. पुढे वाकत श्वास बाहेर सोडा व हात समोर पालथे ठेवावे. कोपरापर्यंत हात जमिनीवर टेकवा. ३. डोकेसुद्धा जमिनीवर टेकवा. ४. काही वेळ अशा स्थितीत राहून पुन्हा वज्रासनात या. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A0400171493050CDB0B7D7108066A9932E4373CD4C488A73E3.file) क्रिया - १. सरळ झोपून डाव्या पायाचा गुडघा छातीवर ठेवा. २. दोन्ही हातांची बोट एकमेकात गुंतवून गुडघ्यावर ठेवा. श्वास बाहेर सोडत गुडघा दाबून छातीला लावा व डोके वर उचलत गुडघ्याने नाकाला स्पर्श करा. जवळ जवळ १० ते ३० सेकंद पर्यंत श्वास बाहेरच ठेवून अशा स्थितीत राहून मग पाय सरळ करा. हे २/४ वेळा करा. ३. असचे दुस-या पायाने पण करा. शेवटी दोन्ही पाय एकदम उचलून आसन करा. म्हणजे एक चक्र पूर्ण झाले. असे ३-४ वेळा करा. ४. दोन्ही पायांना पकडून कंबरेला मालीश करा. शरीराला मागे पुढे उजवीकडे डावीकडे करा. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A03FF72C44EDB801F1F233B348C42C2D3310607505ED49B92A.file) क्रिया : १) पद्मासनाच्या स्थितीत बसून हातांची मदत घेऊन मागे कोपरे टेकवून झोपा. २) हात वर उचलून तळहात खांद्यामागे जमिनीवर टेकवा. तळहातांवर दाब देऊन मान जितकी मागे वळवता येईल तेवढी वळवा. पाठ ताणलेली व छाती वर उचललेली असावी. गुडघे जमिनीपासून दूर होऊ देऊ नका. ३) हातांनी पायांचे अंगठे पकडून कोपरे जमिनीला टेकवा. श्वास आत घ्या. ४) आसन सोडताना ज्या स्थितीत सुरु केले होते त्याच स्थितीत परत या खांदे व डोके जमिनीवर टेकवत पाय सरळ करून शवासनात झोपा. ५) हे सर्वांगासनाचे प्रतियोगी आसन आहे. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A05C073D88393A46D6CEC2124A4B485F04B7351657925D3E08.file) क्रिया : १) वज्रासनात बसून दोन्ही हाताच्या मुठी वळवा. मुठी बंद करताना अंगठे बोटांच्या आत दाबून ठेवा. २) दोन्ही मुठी नाभीच्या दोन्ही बाजूला लावून श्वास बाहेर सोडा व समोर वाका. नजर समोर ठेवा. ३) थोडावेळ या स्थितीत राहून मग पुन्हा वज्रासनात या. असे ३-४ वेळा करा. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A08ABE031FBEE68287B180E06BDBAAE44FA6AB93E581781135.file) क्रिया - १. जमिनीवर पालथे झोपा. गुढघ्यात पाय दुमडून टाचा नितंबावर ठेवा. गुडघे व पंजे एकमेकांना जोडलेले असावेत. २. दोन्ही हातांनी पायांच्या घोट्याजवळ पकडा. ३. श्वास आत घेऊन गुढघे व मांड्यांना क्रमशः उचलत वरच्या बाजूला ताणा. हात सरळ असू द्या. ४. मागचा भाग उचलल्या नंतर पोटाचा वरील भाग छाती, मान व डोकेसुद्धा वर उचला. नाभी व पोटाच्या खालचा भाग जमिनीवरच असू द्या. ५. शरीराची आकृती प्रत्यंचा ताणलेल्या धनुष्यासारखी होईल. अशा स्थितीत १० ते ३० सेकंद रहा. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A01F318AFE2B4F23D0E804D344A41D24E4146DE8227510AA53.file) क्रिया -१. शवासनात झोपून दोन्ही हात डोक्याच्या मागे सरळ ठेवत जोडा. २. श्वास आत घेऊन पाय, डोक व हात हळूहळू एक फूट वर उचला. नितंब व पाठीचा खालचा भाग जमिनीवर असू द्या. नजर छातीवर ठेवा. ३. परत येताना श्वास हळूहळू हात, पाय व डोके जमिनीवर टेकवा. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A01BC9813A082A1382284A4932D4CE807016861C49EAE3B66B.file) क्रिया - १. जमिनीवर पाठीवर सरळ झोपा. तळहात जमिनीवर टेका. पाय सरळ आणि पंजे एकमेकांना जोडलेले असावेत. २. आता श्वास आत घेऊन पायांना एक फूटापर्यंत (जवळ जवळ ३० अंशापर्यंत) सावकाश वर उचला व काही वेळ अशाच स्थितीत ठेवा. ३. नंतर मग हळू हळू पाय जमिनीवर परत ठेवा. थोडा विश्राम केल्यावर हिच क्रिया परत करा. असे ३ ते ६ वेळा करा. ४. ज्यांची कंबर जास्त दुखते त्यांनी एकेक पायाने क्रमशः हा सराव करा. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A035BFA0070D7345E459A5EC916BA10BC99123165D343BADF8.file) क्रिया -१) सरळ झोपून दोन्ही गुढघे दुमडून पायांना नितंबाजवळ ठेवा. २) दोन्ही हातांनी पायांच्या घोट्यांना पकडा. ३) श्वास आत घेऊन कंबर व नितंब वर उचला. खांदे, डोके व तळपाय जमिनीवरच राहू द्या. या स्थितीत १५/२० सेकंद रहा. ४) पूर्वस्थितीत येताना श्वास सोडत हळू हळू कंबर जमिनीवर टेकवा. असे ३/४ वेळा करा. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A095B8F32268C46B45C90BA3B2333192447D5DABB2C076660D.file) क्रिया -१) पद्मासनात बसून डाव्या हाताने पाठीच्या मागून डाव्या पायाचा अंगठा पकडा. याचप्रमाणे उजव्या हाताने पाठीच्या मागून उजव्या पायाचा अंगठा पकडा.२) कंबर व मेरूदंड सरळ ठेवा. डोळे बंद करून मनाला एकाग्र करा. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A06FF5824B9721622AB1D199CC782AD50664EB6E2D704E65CE.file) क्रिया - १. दोन्ही तळपाय एकमेकांना जोडून समोर ठेवा. २. आता शिवणीला टाचेवर ठेवून त्यावर बसा. ३. दोन्ही गुडघे जमिनीला टेकलेले असावेत. ४. हात ज्ञानमुद्रेच्या स्थितीत गुडघ्यावर ठेवा. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A050D45EFDBB33A508279CF92BB48A4A11B44B62CBBC27C729.file) शरीराच्या सर्व भागांना या आसनाचा फायदा होतो म्हणून या आसनाला सर्वांगासन असे म्हणतात. सगळ्या वयांतील व्यक्तींना हा आसन प्रकार करता येऊ शकतो. कमीतकमी १० मिनिटे हा योगासनाचा प्रकार केला तरी चालतो.क्रिया :-१) जमिनीवर सरळ झोपा. पाय एकमेकांशी जोडलेले असावेत. दोन्ही हातसुद्धा सरळ असावेत. आणि तळहात जमिनीवर टेकलेले असावेत.२) श्वास आत घेऊन पायांना हळूहळू ३० अंश, मग ६० अंश आणि शेवटी ९० अंशापर्यंत उचला. पाय उचलतांना हातांची मदत घेऊ शकता. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A07236E38A54DC67413FB9C4C7A7A928958650585C542019FB.file) कृती - १) दोन्ही पायांमध्ये कमीत कमी दीड फुटाचे अंतर ठेऊन सरळ उभे रहा. २) दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत बाजूला पालथे ठेवा. ३) श्वास आत घेवून डावा हात पुढे घेवून डाव्या पायाच्या पंजाजवळ जमिनीवर टेकवा अथवा हात डाव्या टाचेला लावा. ४) उजवा हात वरच्या बाजूला उचला. ५) मान वळवून उजव्या हाताकडे नजर करा. ६) उजवा हात वर उचलून मन डावीकडे करा व उजव्या कानावर हात ठेवा. ७) मग श्वास सोडत पूर्व स्थितीत येऊन असाच सराव दुसऱ्या बाजूने करा. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A0178B851272EB42C32A8678BFEE9B8C36C9872078966A98C2.file) कृती -1) दोन्ही पाय गुडघ्यांत घडी घालून बसावे. (वज्रासन)2) पायाचे अंगठे एकमेकाला चिकटलेले ठेवावे.३) टाचा एकमेकींपासून दूर ठेवून त्यावर बसावे.४) गुडघे एकमेकांस जुळलेले ठेवावेत. म्हणजे वज्रासन तयार होईल.५) आता कोपराचा आधार घेऊन सावकाश पाठीवर झोपावे. डोक्याची मागील बाजू व खांदे जमिनीवर टेकवावे.६) दोन्ही हातांनी डोक्याच्या पलीकडे हाताची घडी घालावी. ७) संथ श्वसन चालू ठेवावे. पाठीचा जास्तीत जास्त भाग जमिनीवर टेकण्याचा प्रयत्न करावा. पाठीची कमान करू नये. तसेच गुडघे उचलू देऊ नयेत. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A01249FCBD0C71F673A66A7E51E901316E191EF7B505716766.file) Sometimes very little physical activity can make you restless and hyper active in your brain because of excessive energy. It is important to have some form of exercise as the mind slows down and as the body speeds up. The Surya Namaskar is a great way to increase your heart rate, sweat a little and utilise every part of your body so that every cell feels the impact of the exercise. If practiced every morning it will keep you energetic during the day and make you sleepy at night. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A023D7A6C92297CB4BADA5D4CD6C6D8ECBBCE87B87D18800E4.file) पद्मासन - पद्म म्हणजे कमल. या आसनात पायाचे तळवे पाण्यावर पसरलेल्या पदमपत्राप्रमाणे दिसतात म्हणून याला पद्मासन म्हणतात.कृती -१) दोन्ही पाय समोर उघडून बसावे. पायाचे अंगठे व टाचा जुळवून ठेवावे. दोन्ही हात कंबरेच्या दोन्ही बाजूस घेऊन तळहात जमिनीवर ठेवावे. मान सरळ व नजर समोर असावी.२) दोन्ही पायांत थोडे अंतर घेऊन डाव्या पायाची घडी करावी. हाताचा आधार घेऊन पाऊल उजव्या मांडीवर व टाच जांघेपर्यंत आणून ठेवावी.३) उजव्या पायाची पण अशीच घडी करून हाताच्या आधारे पाऊल डाव्या मांडीवर व टाच जांघेपर्यंत घ्यावी. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A07AD6CD33BD61D347CC7574F7C1BCB5E8CCA96A3D9EEF379D.file) या आसनात शरीराची स्थिती नौकेप्रमाणे होत असल्याने या आसनास नौकासन असे म्हणतात.कृती -१) पोटावर झोपावे (पालथे) हनुवटी जमिनीवर ठेवावी. दोन्ही हात सरळ मांड्याजवळ ठेवून तळवे पूर्णपणे जमिनीव टेकलेले ठेवावेत. पायांचे अंगठे व टाचा एकमेकांना चिकटून ठेवाव्यात. पायांच्या बोटांची नखे जमिनीवर टेकतील.२) दोन्ही हात खांद्याच्या वरून डोक्याकडे सरळ नेऊन जमिनीवर टेका. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जुळवून ठेवा.३) श्वास सोडा व श्वास घेत घेत पुढून हात व मान व मागून पाय सरळ ठेवून सावकाश वर उचला. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A065CBF31231758D1A2A02DDA89AE96D7877FDB20FD36CED15.file) पश्चिमोत्तानासन म्हणजे पाठीमागची बाजू. या आसनात मानेपासून पायांच्या घोट्यापर्यंतच्या सर्व पाठीमागच्या शरीराच्या भागास ताण मिळतो म्हणून याला पश्चिमोत्तानासन म्हणतात.कृती -१) दोन्ही पाय समोर उघडून बसावे. पायांचे अंगठे व टाचा जुळवून ठेवावे. दोन्ही हात कंबरेच्या दोन्ही बाजूस ठेवावे. दोन्ही हात कंबरेच्या दोन्ही बाजूस ठेवावे. मान सरळ व नजर समोर असावी.२) थोडे समोर वाकून हनुवटी जमिनीला समांतर ठेवून कंबरेतून वाकून डाव्या हाताने डाव्या हाताचा अंगठा पकडावा. व उजव्या हाताने उजव्या हाताचा अंगठा पकडावा. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A06DF93D824760C6EBA4C0AFCA83FC0014413E4CA880D1DD32.file) या आसनात पाठीच्या कण्याची स्थिती भुजंगासारखी होत असल्याने या आसनाला भुजंगासन असे म्हणतात.कृती -१) पोटावर झोपावे. हनुवटी जमिनीवर टेकवावी. दोन्ही हात सरळ मांड्यांजवळ ठेवून तळवे पूर्णपणे जमिनीवर टेकलेले ठेवावेत. पायांचे अंगठे व टाचा एकमेकांना चिकटून ठेवावे, पण चवडे मागे ताणून ठेवावेत.२) दोन्ही हात छातीशेजारी टेकवावेत. हातांची कोपरे आकाशाच्या दिशेने ठेवा. कपाळ टेका, श्वास सोडा व श्वास घेत प्रथम कपाळ व हनुवटी वर उचला. मान मागच्या दिशेने वाकवत खांदे, छाती हळूहळू वर उचला. हात कोपरात सरळ होईपर्यंत वर घ्या. श्वसन Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A0FA3135BADC51BABED00EBF2591BCFF772EAB86BE289A6964.file) हल म्हणजे नांगर. या आसनाच्या पूर्णावस्थेत शरीराचा आकार नांगराप्रमाणे भासतो, म्हणून याला हलासन म्हणतात.कृती -१) पाटीवर झोपावे. पाय सरळ ठेवून टाचा व अंगठे जुळवून ठेवावेत. हात शरीरालगत सरळ ठेवावेत. तळहात जमिनीच्या दिशेने ठेवावेत. मान सरळ ठेवावी.२) श्वास सोडावा व श्वास घेत दोन्ही पाय जमिनीशी काटकोनात आणावेत व लगेच हातांनी जमिनीला रेटा देऊन पाय डोक्याच्या दिशेने नेणे.३) पाय सैल सोडून डोक्यापलीकडे जमिनीवर टेकवणे. श्वसन नेहमीप्रमाणे चालू ठेवणे४) हात जमिनीवर ठेवणे. Read More....
|
)/10190E094B8E5F1DBC907D6A8DED43A0FA199D59A4F538F9FE78DED43C31137647AD510141E47301.file) या आसनात शरीर मागच्या दिशेने वाकवून शरीराची अवस्था चक्राप्रमाणे गोलाकार केली जाते म्हणून याला चक्रासन म्हटले जाते.कृती -१) पाठीवर झोपावे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा व शरीराच्या जवळच उभे करा व दोन्ही पायांमध्ये खांद्याएवढे अंतर ठेवा.२) दोन्ही हात उचलून तळवे उलटे करून डावा हात डाव्या खांद्याच्या व उजवा हात उजव्या खांद्याखाली सरकवा.३) श्वास घेत घेत हळुवार खांदे वर उचला. मान सैल सोडा, हात कोपरात व पाय गुडघ्यात सरळ होईपर्यंत कंबर वर उचला. श्वसन संथ चालू ठेवा.फायदे - आपण व्यवहारात नेहमी पुढे वाकत असतो. Read More....
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा