शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

वर्णमाला

1. स्वर :

ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराची मानली जातात.
मराठी भाषेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ असे एकूण बारा स्वर आहेत.

वरील स्वरांचे एकूण तीन प्रकार पडतात.

र्‍हस्व स्वर,
दीर्घ स्वर,
संयुक्त स्वर
1. र्‍हस्व स्वर :

ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्‍हस्व स्वर असे म्हणतात.
उदा. अ, इ, ऋ, उ
2. दीर्घ स्वर :

ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.
उदा. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ
स्वरांचे इतर प्रकार

1. सजातीय स्वर :

एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्‍या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.
उदा. अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ
2. विजातीय स्वर :

भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्‍या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
उदा. अ-ई, उ-ए, ओ-ऋ
3. संयुक्त स्वर :

दोन स्वर मिळून तयार होणार्‍या स्वरांना संयुक्त स्वर  असे म्हणतात.
याचे 4 स्वर आहेत.

ए – अ+इ/ई
ऐ – आ+इ/ई
ओ – अ+उ/ऊ
औ – आ+उ/ऊ
2. स्वरादी :

ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी  असे म्हणतात.
स्वर + आदी – स्वरादी

दोन स्वरादी – अं, अः स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.
दोन नवे स्वरदी : ओ, औ हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत.
उदा. बॅट, बॉल
स्वरादीचे एकूण तीन भाग पडतात.

अनुस्वार,
अनुनासिक,
विसर्ग
क. अनुस्वार –

स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणारा वर्ण किंवा स्वरानंतर होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार होय. जेव्हा हा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेव्हा त्याला अनुस्वार असे म्हणतात.
उदा. गंगा, चंचल इत्यादी.
ख. अनुनासिक –

जेव्हा अनुस्वाराचा उच्चार ओझरता होत असेल तेव्हा त्या उच्चाराला अनुनासिक असे म्हणतात.
उदा. घरात, जेंव्हा, फुफ्फुसांतील, यांतील, आंतील इत्यादी.
ग. विसर्ग –

विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे असा होतो. विसर्गाचा उच्चार होत असतांना स्वराच्या उच्चारानंतर ह सारखा उच्चार होतांना हवेचे किंचित विसर्जन होते म्हणून यास विसर्ग असे म्हणतात. याचे चिन्ह लिहून दाखविताना अक्षराच्या पुढे दोन टिंब देतात.
उदा. स्वत:, दु:ख:, नि:स्पृह: इत्यादी.
3.व्यंजन :

एकूण व्यंजन 34 आहेत.

ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.
व्यंजनाचे पाच प्रकारात वर्णन केले जाते.


स्पर्श व्यंजन (25)
अर्धस्वर व्यंजन (4)
उष्मा, घर्षक व्यंजन (3)
महाप्राण व्यंजन (1)
स्वतंत्र व्यंजन (1)
1. स्पर्श व्यंजन :

एकूण व्यंजन 25 आहेत.

वर्णमालिकेतील क ते य पर्यंतच्या वर्णाचा उच्चार होत असतांना तोंडातील जीभ, कंठ, टालू, मुर्धा, दात व ओठ इत्यादी अवयवांशी स्पर्श होतो यामुळे या वर्णाला स्पर्श व्यंजने असे म्हणतात.
उदा.

क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म
स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

कठोर वर्ण
मृदु वर्ण
अनुनासिक वर्ण
1. कठोर वर्ण –

ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.
उदा. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ
2. मृद वर्ण –

ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात.
उदा. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब ,भ
3. अनुनासिक वर्ण –



ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.
उदा. ड, त्र, ण, न, म

साप्ताहिक सराव टेस्ट

साप्ताहिक सराव टेस्ट

testmoz.com/1861108

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

नाशिक जिल्ह्यात आमचे रिकॉर्ड

" width="33" height="34" alt="Bouncing ball">

Sayukt sankhya संयुक्त संख्या

Varg sankhya (वर्ग आणि वर्गसंख्या)

वर्ग आणि वर्गमूळ काढा काही सेकंदात find square root in few seconds




बुधवार, ११ जुलै, २०१८

प्रेरणादायक सुविचार

 प्रेरणादायक सुविचार

1. भरलेला खिसा माणसाला दुनियी दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
2. स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
3. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
4. चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
5. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
6. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.
7. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
8. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
9. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
10. स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
11. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
12. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
13. मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
14. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
15. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
16. या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
17. “जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”
18. डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
19. भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..
20. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.
21. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.
22. आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
23. जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल ………..
24. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
25. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
26. कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.
27. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.
28. मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.
29. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
30. स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.
31. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
32. विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
33. सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.
34. नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.
35. अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.
36. जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
37. मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
38. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा.
39. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
40. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.
41. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे.बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा, जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका | कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.
42. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून …
43. न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.
44. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
45. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
46. छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
47. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.
48. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.
49. विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
50. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.
51. कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.

बुधवार, ३० मे, २०१८

Railway Protection Force (RPF)
Advt No 01/2018
Constable Vacancies 2018
नवीन बँच सुरु  संपर्क ८६६८५२४३४२ ,८४२१४९०७५८
Application Fee
  • For Others: Rs.500/-
  • For SC/ ST/ Ex Serviceman/ Female/ Minorities/ Economically Backward Classes: Rs.250/-
  • Payment Mode (Online): Debit/ Credit Card/ Internet Banking
  • Payment Mode (Offline): Post Office Challan
 Important Dates
  • Starting Date for Apply Online: 01-06-2018 at 10:00 hrs
  • Last Date for Apply Online: 30-06-2018 by 23:59 hrs
  •  Last Date for Payment of Fee through Online: 02-07-2018
  • Last Date for Payment of Fee through Online: 05-07-2018
  • Tentative Date for Computer Based Test:  In Sep & Oct 2018
Age Limit as on 01-07-2018
  • Minimum Age: 18 Years
  • Maximum Age: 25 Years
  • Age relaxation is admissible as per rules.
Qualification
  • SSLC/ Matric from a recognised Board.
Vacancy Details
 Post Name Male Female Total
 Constable 4403 4216 8619
Interested Candidates Can Read the Full Notification Before Apply Online
Important Links
Apply Online Available on 01-06-2018
English Notification Click here
Hindi Notification Click here
 Employment Newspaper Click here
Other Links  Click here
 Official Website Click here

मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

प्रतियोगिता दर्पण हिंदी



PD-English-December,17
download

मंगळवार, २७ मार्च, २०१८

पदावली

पदावली : नियम
जर दिलेल्या पदावलीत एकापेक्षा जास्त गणिती क्रिया सोडवावयाच्या असतील, तर कंचेभागुबेव या क्रमाने पदावली सोडवावी. म्हणजेच,
सर्वात प्रथम कंस सोडवावा.


कंस सोडविताना भागाकार, गुणाकार व नंतर बेरीज, वजाबाकी हा क्रम ठेवावा.
उदा. 25 + (12 × 15 ÷ 5 – 6) अशी पदावली आहे.
25 + (12 × 15 ÷ 5 – 6)
= 25 + (12 × 15 ÷ 5 – 6)
= 25 + (12 × 3 – 6)
= 25 + (36 – 6)
= 25 + 30
= 55
पदावली : नियम २ 
जर कंस नसेल तर ज्या क्रमाने गुणाकार व भागाकार यापैकी जि क्रिया आधी  ती आधी करावी
6+6*6-6/6
यात आधी गुणाकार करा 6+6*6-6/6
6+36-6/6
नन्तर भागाकार करा 6+36-6/6
6+36-1
नन्तर बेरीज 
42-1=41
41

बुधवार, २१ मार्च, २०१८

practice paper

सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८

करिअर मार्गदर्शन

१० वी व १२ वी नंतर पुढे काय ?


हा प्रश्न खरंतर आज सर्वच पालकांना व विद्यार्थ्यांना पडलेला असतो. जो तो आपआपल्या परीने उत्तरं शोधत असतो,बहुतेकदा शेजारी-पाजारी नातेवाइक फारफार तर एखादे वर्तमानपत्र ह्यांची मद्त सामान्य पालक व विद्यार्थी घेतात. .

करीअरची दिशा ठरवण्याचा योग्य काळ कुठला ?

करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवली पाहिजे
आयुष्यातील दहावीचे वर्ष खूप महत्त्वाचे मानले जाते. चांगल्या करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवावी. ज्या प्रमाणे कोणत्याही गोष्टीचे नियोजन केल्याने ती गोष्ट जरी कमी असली तरी पुरते हा आपल्या रोजच्या जीवनातील अनुभव असतो, तसेच करीयरचे नियोजन केल्याने सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थीही उच्च स्थानी पोहचू शकतात.

कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा हे कसे ठरवावे ?
पालकांनी व विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. दहावीनंतर विद्यार्थ्याला विविध अभ्यास शाखा उपलब्ध असतात. बर्‍याचदा गुण चांगले असतात, मात्र कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा? हा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही पडतो.

1 सगळ्यात आधी विद्यार्थ्याचा स्वतःचा कल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 2 विद्यार्थ्याला कुठल्या विषयात करीयर करायचे आहे, हे समजून घ्या.
3 मग त्याविषयीचा विचार करा. त्या दिशेला नोकरीच्या संधी किती उपलब्ध आहेत? त्याचे मन त्या विषयात रमेल काय? याबाबत त्याला सविस्तर मार्गदर्शन केले पाहिजे.
4 त्याचवेळी त्याची त्या विषयातली अभिरूची, योग्यता व क्षमता पाहणेही महत्त्वाचे आहे. पालकवर्ग विद्यार्थ्यांमधील क्षमता न बघता, त्याच्या इच्छेचा कुठलाही विचार न करता त्याला त्याच्या मनाविरूध्द शाखेकडे ढकलतात. मुळातच त्याच्या दृष्टीने चुकीचा विषय निवडला जातो. त्यात विशेष प्राविण्य मिळवता न आल्याने त्याच्यात वैफल्य निर्माण होते व तो करीयरच्या पहिल्या पायरीवर डगमगतो.
कोणते करियर योग्य ठरेल हे कसे तपासावे ?
कोणते करियर योग्य ठरेल हे तपासण्यासाठी विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक मोजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध चाचण्या आहेत. अनेक मानसोपचार तज्ज्ञ या चाचण्या करतात. बुद्ध्यांक अचूक नसला तरी त्याचा मार्गदर्शनासाठी फार उपयोग होऊ शकतो. या प्रकारच्या चाचण्या घेऊन मार्गदर्शन करणार्‍या अनेक संस्था आहेत. साधारणपणे एप्रिल ते जून या महिन्याच्या कालावधीत या चाचण्या घेतल्या जातात.

मुलांच्या मार्गदर्शनाची दिशा काय असावी ?
भरपूर पैसा व प्रतिष्ठा मिळव हे तर दहावी झाल्यावर सर्वांचे स्वप्न असते. विविध प्रकारच्या कौशल्यात प्राविण्य मिळवलेल्यांची समाजाला गरज असते. या कौशल्याच्या जोरावर सा व प्रतिष्ठा मिळते. पालकांनी विद्यार्थ्यांना या बाबी सांगितल्या पाहिजेत. दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांना व्यवहारज्ञान फारसे नसते. त्यांना अभ्यास एके अभ्यास या पलीकडे काय असते याची जाणीव नसते. त्यामुळे चांगल्या करीयरची निवड करताना ते गोंधळून जातात. या परिस्थितीत पालकांनी मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. व्यवहाराच्या चार गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजे. मुलाच्या चांगल्या करीयरच्या दृष्टीने आपल्या शहरात अथवा शहराबाहेर कुठल्या महाविद्यालयात कोणकोणते अभ्यासक्रम शिकविले जातात याची माहिती काढावी..


पूढील विषयांचे प्रश्न विचारा तर ..
करिअर
- विविध टिप्स
- दूरशिक्षण
- कोर्स नुसार प्रश्न व माहिती
- शिक्षणानुसार मार्गदर्शन
सल्ला मार्गदर्शन
- १० / १२ वी नंतर पुढे काय ?
- चाकोरी मोडा / वेगळ्या वाटा
- आदर्श वास्तु कशी असावी ?
कोर्स नुसार प्रश्न
- माहितीचा अधिकार
- गाहक संरक्षण कायदा
- तक्रार करायची आहे ?
- गृहनिर्माण सोसायटीचे प्रश्न
क्षेत्रानुसार संधी
- सरकारी नोकरी
- दूरशिक्षण
- कोर्स नुसार प्रश्न व माहिती
- शिक्षणानुसार मार्गदर्शन



करिअर संदर्भात आपले काही काही प्रश्न
  1. संरक्षण खात्यात नोकरीच्या काय संधी आहेत ?
  2.  U.P.S.C ची पदे कशा पद्धतिने पद प्राप्त होते ?
  3. १० वी व १२ वी तसेच पदवी नंतर पुढे काय ?
  4. कोणा कडून माहिती घेऊ शकतो ?
  5. माहिती म्हणजे नक्की काय ?
  6. माहिती अधिकार म्हणजे काय?
  7. माहितीचा अर्ज कसा सादर करावा ?
  8. सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे कोण ?
  9. १० वी व १२ वी तसेच पदवी नंतर पुढे काय ?
शैक्षणिक धोरणाच्या प्रत्येक राज्याचा व केंद्रसरकारचा विचार व पद्धत व अभ्यासक्रम जरी वेगवेगळा असला तरी वैचारीक बैठक मात्र सार्खीच आहे . १० वी नंतर ३ मुख्य शाखा निर्माण केलेल्या आहेत.
१ . कला 
२ . वाणिज्य (कॉमर्स)
 ३ . विज्ञान
ज्यांना आपल्या शैक्षणीक जीवनात मग ते पारंपारीक शिक्षण असो की पदवीका असो यापैकी एका मार्गाची निवड करावी लागते. मात्र व्यवसायीक शिक्षण व डिप्लोमा यासाठी १० वी नंतर प्रवेश मिळ्तो.

तरीही विद्यर्थ्यांनी शक्यतो १० वी नंतर जरी डिप्लोमाला किंवा व्यावसायीक क्षेत्राची नि वड केली तरी बाहेरुन १२ वी परीक्षा पास करावी. विद्यार्थ्यांनी विषयाची निवड करताना विशेष  काळजी घ्यावी जेणे करुन त्यांचे भविष्य उज्वल होइल . क्षेत्राची निवड करताना स्वतःची आवड, अभ्यास करण्याची क्षमता ( भविष्यात याच क्षेत्रात आयुष्य्भर काम करयचे आहे याची जाणीव ठेवणे. ) तसेच त्याक्षेत्राची भविषात करीअर विषयक संधी कश्या आहेत याचा विचार करुनच निवड करावी.
खाली दिलेल्या क्षेत्रां पैकी क्लीक केल्यास त्या क्षेत्रातील संधींची माहीती मिळेल .
मुलगा /मुलगी १०वी, १२वी आणि पदवी झाले पण करियर कोणते निवडावे  हे कळत नाही यासाठी प्रत्येक घटकाचा विचार करून खास पालक व मुलासाठी करीयरच्या संधी व त्याची तपशीलवार माहिती